गिरीश खत्री यांची कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्षपदी नियुक्ती; उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन

45

पुणे : भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे सक्रिय कार्यकर्ते श्री. गिरीश खत्री यांची ‘कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष’ पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि कोथरुडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी गिरीश खत्री यांची भेट घेऊन त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, संघटनात्मक कार्यातील गिरीश खत्री यांचा प्रदीर्घ अनुभव, पक्षाप्रती असलेले त्यांचे समर्पण आणि प्रभावी नेतृत्वकौशल्य हे कोथरुडमध्ये पक्षवाढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते गिरीश खत्री यांनी नियुक्तिपत्र स्वीकारले. पक्षाची विचारधारा, संघटनाची ताकद आणि “राष्ट्र प्रथम” हा विचार केंद्रस्थानी ठेवून सामान्य कार्यकर्ता, नागरिक आणि परिसराच्या विकासासाठी निष्ठेने व प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धार यावेळी खत्री यांनी व्यक्त केला.

गिरीश खत्री यांची नियुक्ती जाहीर होताच कोथरुड परिसरातील भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. खत्री यांचा जनसंपर्क आणि कामाचा आवाका मोठा असल्याने आगामी काळात मंडल स्तरावर विविध सामाजिक आणि राजकीय उपक्रम राबवण्यास गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Get real time updates directly on you device, subscribe now.