कोथरुडमध्ये ठाकरे गटाला खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

13

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. कोथरुड विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, प्रभाग क्रमांक ९ आणि ११ मधील अनेक मान्यवर पदाधिकाऱ्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा पार पडला.

या पक्षप्रवेशामुळे कोथरुडमध्ये भाजपची ताकद दुपटीने वाढली असून, आगामी महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या विजयाची ही ‘नांदी’ असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी नमूद केले. तसेच पाटील यांनी या सर्वांचे भाजपामध्ये मनःपूर्वक स्वागत करून अभिनंदन केले व त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कोथरुड हा आधीच भाजपचा बालेकिल्ला आहे. आता या मोठ्या पक्षांतरामुळे कोथरुडमधील राजकीय समीकरणे बदलली असून, आगामी निवडणुकीत भाजपची पकड अधिक घट्ट होण्याची चिन्हे दिसत आहेत. या सर्व घडामोडींमुळे, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोथरुडमध्ये झालेले पक्षांतर भाजपसाठी आगामी निवडणुकीत विजयाचा मार्ग सोपा करणारे ठरू शकते.

Get real time updates directly on you device, subscribe now.