पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठे खिंडार; अनेक कॉंग्रेस-राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

14

पुणे : पुणे शहरातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या सर्वांचे भाजपामध्ये मनःपूर्वक स्वागत करून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

मुरलीधर मोहोळ यावेळी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख नेतृत्वावर विश्वास ठेवत कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांचं मोहोळ यांनी भारतीय जनता पार्टीत स्वागत करत प्रवेशाबद्दल धन्यवाद व्यक्त केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष राजेंद्र खांदवे, शिक्षण मंडळाचे माजी सदस्य नानासाहेब नलावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष महेश पाटील, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सदस्य भुजंग लव्हे, राहुल लव्हे, लोहगावचे माजी उपसरपंच सोमनाथ खांदवे, दीपक खांदवे, विनोद काळे, गणेश माने, शंकर शेटकर, काशिनाथ पवार आदींचा यावेळी पक्षप्रवेश झाला.

Get real time updates directly on you device, subscribe now.