बाणेरमध्ये भाजपचे शक्तीप्रदर्शन; लहू बालवडकर यांच्या विजयासाठी मंत्री चंद्रकांत पाटील आणि बावनकुळेंचे आवाहन
बाणेर : पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ९ चे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार लहू बालवडकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून लहूजींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. बाणेर येथील माऊली गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या या अभिष्टचिंतन सोहळा व स्नेहभोजन कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहत शुभेच्छांचा वर्षाव केला.

येत्या १५ जानेवारी रोजी पुणे महानगरपालिकेसाठी मतदान होत असून, विकासनिष्ठ, कार्यक्षम आणि जनतेशी सतत संवाद साधणाऱ्या लहू बालवडकर यांना मतरूपी आशीर्वाद देऊन मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सर्व नागरिकांना केले.
या कार्यक्रमास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार जगदीश मुळीक, प्रभाग क्रमांक ९ चे भाजपा उमेदवार लहू बालवडकर, गणेश कळमकर, रोहिणी चिमटे, मयुरी कोकाटे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.