कोथरुडच्या विकासासाठी भाजपला साथ द्या; प्रभाग क्र. ३० मधील चौकसभेत चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आता अवघे ८ दिवस शिल्लक असताना, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी कोथरुडमधील प्रभाग क्रमांक ३० मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ चौकसभांचा धडाका लावला आहे. यावेळी त्यांनी स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधून भाजपला कौल देण्याचे आवाहन केले.

प्रचारादरम्यान कोथरुडमधील माता-भगिनींनी चंद्रकांत पाटील यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. नागरिकांनी त्यांच्या कार्यालयामार्फत राबवल्या जाणाऱ्या लोकोपयोगी उपक्रमांचे कौतुक केल्याने प्रचारात एक वेगळेच ‘नवचैतन्य’ पाहायला मिळाले. विकसित पुण्याच्या संकल्पनेसाठी आणि कोथरुडच्या सर्वांगीण प्रगतीसाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
कोथरुडमधील प्रभाग ३० हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो, मात्र आगामी १५ जानेवारीच्या निवडणुकीसाठी पक्षाने येथे आपली पूर्ण ताकद झोकून दिली आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून १६ जानेवारीला लगेच निकाल देखील समोर येणार आहे.