पुण्याच्या विकासाची गती कायम राखण्यासाठी भाजपलाच विजयी करा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

62

पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रभाग क्रमांक ३१ (कोथरूड) मध्ये भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ जनसंवाद साधला. परमहंस नगर आणि गुजरात कॉलनी येथे झालेल्या चौकसभांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी करत भाजपला पाठिंबा दर्शवला.

भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुणे शहरात भरीव विकासकामे झाली. मेट्रो प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना, नदीसुधार प्रकल्प तसेच वाहतूक कोंडीमुक्तीसाठी उड्डाणपूल अशा अनेक महत्त्वपूर्ण विकासकामांमुळे पुण्याच्या विकासाला नवी दिशा मिळाली आहे. हीच विकासाची गती कायम ठेवण्यासाठी येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.

यावेळी भाजपा मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर, प्रभाग क्रमांक ३१ चे उमेदवार पृथ्वीराज सुतार, ज्योत्स्ना कुलकर्णी, दिनेश माथवड, वासंती जाधव यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप मध्य मंडल अध्यक्ष निलेश कोंढाळकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या भागात जोरदार शक्तिप्रदर्शन केले. प्रभाग ३१ हा कोथरूडमधील अत्यंत महत्त्वाचा प्रभाग असून, येथे भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.