देशातील विकासाचा वेग पुण्यात अधिक बळकट करण्यासाठी भाजपला विजयी करा, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आता केवळ ७ दिवस शिल्लक असताना, कोथरूड उत्तर भागात प्रचाराची धामधूम वाढली आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रभाग क्रमांक ९ मधील बाणेर येथील ‘व्हीटीपी ब्लेअर’ सोसायटीला भेट देऊन रहिवाशांशी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देश व राज्यात विकासाचा प्रवाह सुरू आहे. हाच विकासाचा वेग पुणे शहरातही कायम राखण्यासाठी भाजप उमेदवारांना मत देण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले. गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रश्नांवर चर्चा करत त्यांनी भाजप सरकारच्या माध्यमातून शहरात झालेल्या मेट्रो, नदीसुधार आणि पाणीपुरवठा योजनांची माहिती दिली.
या प्रसंगी भाजपा कोथरुड उत्तर मंडल अध्यक्ष सचिन पाषाणकर, निवडणूक प्रमुख प्रकाशतात्या बालवडकर, प्रल्हाद सायकर, भाजपा नेत्या जागृती विचारे यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी तसेच सोसायटीचे रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेसाठी गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, बाणेर-बालेवाडी या प्रभाग ९ मध्ये चौरंगी लढत पाहायला मिळत आहे.