प्रभाग २४ मध्ये भाजपचा झंझावात! मंत्री चंद्रकांत पाटलांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानासाठी आता केवळ ६ दिवस शिल्लक असताना, प्रभाग क्रमांक २४ मध्ये भारतीय जनता पक्षाने आपला प्रचार शिगेला पोहोचवला आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आज या प्रभागात भव्य कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यादरम्यान विविध पक्षांतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सर्वांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. एकजुटीच्या बळावर विकासाच्या विजयाचा संकल्प यावेळी अधिक दृढ झाला. पुणे महानगरपालिकेसाठी येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षांतील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने प्रभाग २४ मध्ये भाजपची संघटनात्मक ताकद वाढली आहे.
या प्रसंगी आ. हेमंत रासने, सुनील कांबळे, भाजपा उमेदवार गणेश बिडकर, देवेंद्र वडके, कल्पना बहिरट, उज्ज्वला यादव, ज्येष्ठ कार्यकर्ते पोपटराव गायकवाड, उद्धवजी बराटे, तसेच प्रभाग क्रमांक २४ चे निवडणूक प्रमुख योगेश जगताप यांच्यासह भाजपाचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.