आगामी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वच स्तरांतून व्यापक व ठोस समर्थन – मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २९ (एरंडवणे-वसंत नगर) मध्ये भारतीय जनता पक्षाने आज भव्य पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. वसंत नगर येथील बालशिवाजी मंडळ ते एरंडवणे नागरिक सहकारी मंडळापर्यंत काढण्यात आलेल्या या पदयात्रेत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वतः सहभाग घेऊन मतदारांशी संवाद साधला.

नागरिकांनी जागोजागी औक्षण करून आणि पुष्पवृष्टी करून पदयात्रेचे स्वागत केले. यावेळी झालेल्या संवादातून स्पष्ट झाले की, आगामी महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला सर्वच स्तरांतून व्यापक व ठोस समर्थन मिळत आहे. विविध सर्वेक्षणांमधूनही भाजपाचे सर्व नगरसेवक निवडून येतील, असा ठाम विश्वास यावेळी चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
या प्रसंगी प्रभाग क्रमांक २९ चे भाजपा उमेदवार पुनीत जोशी,सुनील पांडे, सौ. मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, तसेच भाजपाचे नेते दीपक पोटे, संदीप खर्डेकर, कुलदीप सावळेकर, दक्षिण मंडल अध्यक्ष गिरीश खत्री यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.