कोल्हापूरच्या विकासासाठी भाजप-महायुतीला साथ द्या; सिंधी समाज बांधवांशी संवाद साधताना मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज शहरातील सिंधी समाज बांधवांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या विकासकामांची माहिती देत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी खासदार धनंजय महाडिक उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश आणि महाराष्ट्र प्रगतीपथावर आहे. हीच विकासाची गंगा कोल्हापूर शहरात अधिक वेगाने प्रवाहित करण्यासाठी भाजप-महायुतीला मतदान करा, असे पाटील यांनी आवाहन केले. सिंधी समाजातील प्रमुख नागरिक आणि व्यावसायिकांनी या चर्चेत सहभाग घेऊन आपल्या समस्या यावेळी मांडल्या. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या समस्या सोडवण्याचे आश्वासन देत सर्वांना सोबत घेऊन चालण्याची ग्वाही दिली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुका प्रदीर्घ काळानंतर होत असून, भाजपने येथे ‘मिशन कोल्हापूर’ अंतर्गत मोठी ताकद लावली आहे. विशेषतः शहरातील व्यापारी पेठा आणि विविध समाज बांधवांच्या गाठीभेटींवर भाजपने आपला भर दिला आहे.