मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग ३० मध्ये भाजपची रॅली; उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे केले आवाहन

17

पुणे : पुणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आपला प्रचार वेगवान केला आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ३० मधील भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅलीचे आज आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभागी होत मतदार बांधवांशी थेट संवाद साधला.

रॅलीदरम्यान मंत्री पाटील यांनी वारजे आणि कोथरूड भागातील मतदार बांधवांशी थेट संवाद साधून भाजपच्या विकासकामांची माहिती दिली आणि उमेदवारांना विक्रमी मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. रॅलीदरम्यान कोथरुड-वारजे परिसरातील विविध भागांत मतदारांनी उमेदवारांचे स्वागत केले.

यावेळी प्रभाग क्रमांक ३० मधील भाजपा उमेदवार सुशील मेंगडे, राजाभाऊ बराटे, रेश्मा बराटे आणि तेजश्री पवळे यांना मतदार बांधवांकडून भरभरून प्रतिसाद व आशीर्वाद मिळाले. पुणे महानगरपालिकेसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून १६ जानेवारी २०२६ रोजी निकाल जाहीर होतील.

Get real time updates directly on you device, subscribe now.