‘संवाद पुणेकरांशी’: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले पुण्याच्या शाश्वत विकासाचे व्हिजन
पुणे : पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्याच्या सर्वांगीण व शाश्वत विकासाच्या व्हिजनला नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा पुणे शहराच्या वतीने विशेष मुलाखत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याच्या पायाभूत सुविधा, वाहतूक, पर्यावरणपूरक विकास आणि भविष्यातील आधुनिक शहरनिर्मितीबाबत आपले स्पष्ट व दूरदृष्टीपूर्ण विचार मांडले. त्यांच्या नेतृत्वातील विकासात्मक दृष्टीकोन ऐकून उपस्थित सर्वच मान्यवर व नागरिक प्रभावित झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘संवाद पुणेकरांशी’ या संवादात्मक कार्यक्रमातून पुण्याच्या सर्वांगीण विकासाची आणि भविष्यातील वाटचालीची स्पष्ट रूपरेषा पुणेकरांसमोर आली.

या संवादात पुण्याला देशातील प्रमुख GCC (Global Capability Centre) हब म्हणून विकसित करण्याचा संकल्प फडणवीस यांनी मांडला. आयटी, स्टार्टअप्स, संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऑटोमोबाईल आणि उच्च शिक्षण या क्षेत्रांमध्ये पुण्याला जागतिक पातळीवर स्पर्धात्मक बनवण्याचं स्पष्ट व्हिजन त्यांनी मांडलं.
मेट्रो, रिंग रोड, मल्टी-मोडल कनेक्टिव्हिटी, नदीसुधार प्रकल्प आणि औद्योगिक गुंतवणूक यामाध्यमातून पुण्याचा पायाभूत विकास नव्या गतीने सुरू असून, पुणे हे केवळ महाराष्ट्राचंच नाही तर भारताचं आर्थिक, तांत्रिक आणि नवोपक्रमाचं केंद्र म्हणून पुढे येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राज्य मंत्रिमंडळातील सहकारी माधुरीताई मिसाळ, खासदार मेधाताई कुलकर्णी यांच्यासह पुणे शहरातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व मोठ्या संख्येने पुणेकर उपस्थित होते.