पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांचे हात अधिक बळकट करण्यासाठी महायुतीला विजयी करा – मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक ६ मधील जुना बुधवार पेठ परिसरात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला. स्थानिक नागरिकांनी विकासाच्या मुद्द्यांवर उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपली मते आणि अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी पाटील यांनी आगामी महानगरपालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हात अधिक बळकट करण्याचे आवाहन केले.
या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी जिल्हाध्यक्ष संदीप देसाई, मंडल अध्यक्ष सुनील पाटील, संयुक्त जुना बुधवार पेठ फुटबॉल सेवाभावी संस्थेचे संस्थापक अविनाश साळेखे, तसेच महायुतीचे प्रभाग क्रमांक ६ मधील उमेदवार दिपा काटकर, शिला सोनुले, माधवी गवंडी, नंदकुमार मोरे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.