कोल्हापूरच्या विकासाचा वेग कायम राखण्यासाठी महायुतीला विजयी करा; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन
कोल्हापूर : महायुतीच्या प्रचारार्थ कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक ५ मधील नागरिकांशी चौक सभेच्या माध्यमातून आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संवाद साधला.यावेळी महायुती सरकारच्या सर्व विकासकामांचा वेग कायम ठेवण्यासाठी आणि महानगरपालिकेच्या सर्वांगीण विकासासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.
पाटील यांनी माहिती दिली कि, २०१४ पासून भाजपाच्या नेतृत्वाखालील शासनाने कोल्हापूरच्या विकासासाठी १४०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा मंडप व इतर विकासकामे प्रगतीपथावर आहेत. यासोबतच शहरात विविध पायाभूत सुविधा आणि नागरी विकासाची अनेक कामे सुरू आहेत. कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारामुळे शहराच्या विकासाला नवे पंख मिळाले असून, टोल बंद केल्याने कोल्हापूरकरांना मोठा दिलासा मिळाला असल्याची माहिती त्यांनी यावेळी नागरिकांना दिली.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव, माजी नगरसेवक चंद्रकांत घाटगे, उमेदवार अनिल आदिक, समीर येवलुजे, पल्लवी देसाई, मनाली पाटील, निलेश देसाई, धीरज पाटील यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.