पुण्यात भाजपची भव्य सांगता सभा; मुख्यमंत्री फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांची तोफ धडाडली

9

पुणे : पुणे महानगरपालिका २०२६ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची सांगता सभा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंगळवारी छत्रपती शिवाजी नगर येथे उत्साहात संपन्न झाली. या भव्य सभेला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. यावेळी येत्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात कमळ चिन्हासमोरील बटण दाबून भाजपाच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन पाटील यांनी नागरिकांना केले.

या प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, आमदार सिद्धार्थ शिरोळे, तसेच भाजपाचे सर्व उमेदवार, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

यावेळी फडणवीस म्हणाले, पुण्यात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारी ही निवडणूक आहे. पुणे आधुनिक व्हावे, येथील जनता आर्थिक दृष्टीने सक्षम व्हावी, यासाठी भाजपा कटिबद्ध आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी क्षेत्रात मेट्रोचे काम सुरू आहे, लवकरच येथील मेट्रो पुणेकरांच्या सेवेत दाखल होईल. तसेच शिवाजीनगर येथे बससेवा व मेट्रो यांचा मल्टिमॉडल प्रोजेक्ट हाती घेणार आहोत, यातून शिवाजीनगरचे चित्र बदलणार आहे. खडकी येथे पुणे-मुंबई रस्त्याचे रुंदीकरण देखील करण्यात आले आहे.

फडणवीस पुढे म्हणाले, अनेक क्रांतिकारकांना प्रेरणा देणारे आद्यक्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे स्मारक उभारले जाणार आहे. तसेच स्त्रीशिक्षणासाठी झटणारे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे देखील स्मारक उभारणार आहोत. वडार समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ तयार केले असून, या समाजातील तरुणांना या महामंडळाद्वारे उद्योगांसाठी बिनव्याजी कर्ज दिले जाईल.

भाजपाला जेव्हा पुण्याची जबाबदारी दिली, तेव्हा कोट्यवधींचे प्रकल्प राबवले. यासोबतच भविष्यातही पुण्याचा विकास करण्यासाठी कोट्यवधींचे प्रकल्प आणणार आहोत. पाणीपुरवठा योजना, मेट्रोचे जाळे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण यासारख्या योजनांद्वारे पुण्याचा विकास होत आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. पुणेकरांनी आपल्या शहराच्या वेगवान विकासासाठी येत्या 15 तारखेला भाजपाच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करावे. पुढची 5 वर्षे तुमच्या विकासाची काळजी आम्ही घेऊ, असेही त्यांनी शेवटी म्हणत आपल्या प्रचाराचा शेवट केला.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, शिवाजी नगर मतदारसंघातून जे १२ उमेदवार भारतीय जनता पक्षाचे आहेत त्यांच्या प्रचारासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित झाले. देवेंद्रजी नेहमीच पुणेकरांच्या पाठीशी उभे आहेत. राज्य शासनाच्या आदेशानुसार पुण्यातील मिळकत धारकांना २०१८ मध्ये रद्द करण्यात आलेली ४० टक्के कर सवलत पुन्हा लागू करण्यात आली. ही सवलत २०१९ पासून सुरु करण्यात आली ते फडणीस यांच्या पुढाकाराने. यासोबतच महिलांचे आरक्षण, आर्थिक मगरसवर्गाला देण्यात आलेल्या सवलती या मोदी सरकारमध्ये झाल्या आहेत.

यासोबतच चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस पक्षावर निशाणा साधला. काँग्रेस पक्षावर जाहीर निषेध त्यांनी व्यक्त केला. एकीकडे काँग्रेस पक्ष म्हणतो महिलांना बरोबरीचं स्थान द्या. महिला पुढे गेल्या पाहिजेत त्या आर्थिकदृष्टया सक्षम झाल्या पाहिजेत आणि दुसरीकडे लाडक्या बहिणांना मिळणाऱ्या १५०० रुपयांवरून ते कोर्टात गेले. यामुळे काँग्रेसचा निषेध पाटील यांनी व्यक्त केला.

Get real time updates directly on you device, subscribe now.