पुणे जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाचा ‘स्वबळा’चा निर्धार; मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत रणशिंग फुंकले

12

पुणे : आगामी पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने आपला आक्रमक पवित्रा स्पष्ट केला आहे. आज पुण्यात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत, पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक ‘स्वबळावर’ लढवण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी आगामी निवडणुकीची रणनिती, संघटनात्मक मजबुती तसेच उमेदवार निवडीसंदर्भात सविस्तर व सकारात्मक चर्चा झाली. बैठकीत उपस्थित असलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी जिल्हा परिषद निवडणूक स्वबळावर लढवावी, असा ठाम सूर लावला. प्रबळ आणि जनसंपर्क असलेल्या उमेदवारांना संधी देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच उमेदवारांची चाचपणी सुरू करण्यात येणार आहे . भाजपची ताकद ग्रामीण भागात वाढली असून, स्वबळावर निवडणूक लढवून जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवू, असा विश्वस यावेळी व्यक्त करण्यात आला.

बैठकीस यावेळी आमदार राहुल कुल, राजेश पांडे, मा. मंत्री बाळाभाऊ भेगडे, आ. संग्राम थोपटे, मा. आ. संजय जगताप, मा. आ. अशोकराव टेकवडे, जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद, मा. जिल्हाध्यक्ष वासुदेव नाना काळे, प्रवीण माने, नवनाथ पडळकर आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.