जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपा-महायुतीचे ‘मिशन कोल्हापूर’; मंत्री चंद्रकांत पाटलांनी फुंकले विजयाचे रणशिंग
कोल्हापूर : आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी कोल्हापुरात भाजपा-महायुतीने आपली कंबर कसली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीमध्ये निवडणूक रणनिती, संघटनात्मक मजबुती, जागावाटप तसेच विजयासाठी आवश्यक असलेल्या सर्व बाबींवर सविस्तर आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र संघटनमंत्री मकरंद देशपांडे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ , खासदार धैर्यशील माने, धनंजय महाडिक, माजी मंत्री विनय कोरे, आमदार राहुल आवाडे, अमल महाडिक, भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, राजवर्धन निंबाळकर, समरजितराजे घाटगे, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, शौमिका महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार प्रकाश आवाडे, सुरेश हळवणकर, संजयबाबा घाटगे यांच्यासह महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी यावेळी या निवडणुकीबाबत निवडणुकीची रणनीती, योग्य नियोजन व भारतीय जनता पार्टी ची ध्येयधोरणे याबाबत उपस्थित सर्वांना मार्गदर्शन केले. या सर्व गोष्टींची अंमलबजावणी करून जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये भाजपाच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.