दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचा झेंडा फडकला… जागतिक गुंतवणूकदारांच्या पसंतीचं ‘डेस्टिनेशन महाराष्ट्र’ असल्याचं स्पष्ट झालंय – मंत्री चंद्रकांत पाटील

65

दावोस : दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राचा झेंडा फडकला आहे. पहिल्याच दिवशी जागतिक गुंतवणूकदारांच्या पसंतीचं ‘डेस्टिनेशन महाराष्ट्र’ असल्याचं स्पष्ट झालंय. स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड ईकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने करण्यात येणारा दावोस दौरा हा भारतात आणि पर्यायाने महाराष्ट्रात ज्ञान, तंत्रज्ञान आणि विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठीचा महत्वाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या मुंबईतील पहिले शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा यावेळी करण्यात आली. या निर्णयाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फडणवीस सरकारचे अभिनंदन केले.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, याचं क्रेडिट अर्थातच राज्यातील महायुती सरकारचे कॅप्टन असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच… उद्योगमंत्री या नात्याने उदय सामंतजीही तेथे आहेत. काही वर्षांपूर्वीच खूप भीषण परिस्थिती महाराष्ट्रात निर्माण झाली होती. जागतिक पातळीवर महाराष्ट्राबाबत साशंकता निर्माण झाली होती. उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक, नवीन उद्योग सुरू करण्यासाठी राजी होत नव्हते. पण महायुती सरकार परत सत्तेत आल्यापासून परिस्थिती बदलली. आता तर देवेंद्रजींच्या कौशल्यामुळे महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ चांगलाच वाढतो आहे… पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलरवर न्यायची आहे. मा. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र त्यात सिंहाचा वाटा उचलेल, यात शंकाच नाही!, असे पाटील यांनी म्हटले.

राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत दर्जेदार आणि तत्पर आरोग्य सुविधा पोहचविण्याचा प्रय़त्न आहे. त्यादृष्टीने यंदा दावोसमध्ये मेडीकल-टेक्नॉलॉजीबाबत एका सत्रात चांगली आणि सकारात्मक चर्चा केल्याचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले. यातून राज्यातील आरोग्य सुविधांसाठीचा रोडमॅप निश्चित करण्यात आला.नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. त्याबाबत दावोसमध्ये घोषणा करण्यात आली. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळविण्यात येत होत्या. त्या मिळाल्यानंतर आज या तिसऱ्या मुंबईतील पहिल्या शहराची घोषणा करण्यात येत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बंगा यांच्याशी चर्चा केली. यामध्ये महाराष्ट्रात हरित औद्योगीक पट्टा (ग्रीन इंडस्ट्रीयल कॉरिडॉर) विकसित करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली. यामुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात विदेशी गुंतवणूक येऊ शकते. यातून एमएसएमई क्षेत्रातील स्पर्धात्मक वातावरण तसेच निर्यात क्षमतेला मोठा वाव मिळणार आहे. शासन आणि बँकेच्या सहकार्यातून महाराष्ट्रातील धोरणात्मक आणि प्रभावी औद्योगिक विकासाला चालना देता येणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.