महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! महाराष्ट्रातील एकूण ८९ अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर… मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन
नवी दिल्ली : भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त देशातील पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील एकूण ९८२ अधिकारी व कर्मचाऱ्यांना शौर्य आणि सेवा पदके जाहीर करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातील एकूण ८९ अधिकारी व कर्मचारी यांना विविध क्षेत्रातील कामगिरीसाठी पुरस्कार जाहीर झाले आहेत.
या पुरस्कारांमध्ये ३१ पोलीस कर्मचाऱ्यांना ‘वीरता पदक’ (GM), उत्कृष्ट आणि विशिष्ट सेवेसाठी दिले जाणारे ‘राष्ट्रपती पदक’ (PSM) पोलीस दलातील ४ अधिकारी आणि सुधारात्मक सेवा विभागातील २ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. उल्लेखनीय सेवेसाठी (MSM) महाराष्ट्रातील पोलीस सेवेतील ४०, अग्निशमन सेवेसाठी ४, नागरी संरक्षण व होमगार्ड सेवेतील ३, सुधारात्मक सेवेतील ५ या अधिकारी-कर्मचाऱ्यांना पुरस्कार जाहीर करण्यात आले. या सर्व पुरस्कार विजेत्यांचं उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अभिनंदन केले.
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयामार्फत दरवर्षी पोलीस, अग्निशमन, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवेतील कार्यासाठी शौर्य आणि सेवा पदके दिली जातात. उल्लेखनीय म्हणजे, शौर्य पदकांचे मानकरी बहुसंख्येने गडचिरोलीतले आहेत. राज्यातल्या महायुती सरकारचे कॅप्टन, मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडेच गृहखात्याची जबाबदारी आहे. त्यांनी नक्षलवाद संपवण्यासाठी योजनाबद्ध पावलं उचलली आहेत. नक्षलवादमुक्तीसाठी त्यांच्या प्रयत्नांना चांगलं यशही मिळालं आहे. याचंच प्रतिबिंब पोलिस पदकांतही उमटलंय . महाराष्ट्र पोलिस यापुढेही अशीच दमदार कामगिरी बजावतील, हे निश्चित, असे पाटील यांनी म्हटले.