आटपाडीत राष्ट्रवादीला धक्का: हणमंतराव देशमुख व चंद्रकांत भोसले यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
सांगली : राष्ट्रवादी काँग्रेसचे आटपाडी तालुका अध्यक्ष हणमंतराव देशमुख, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत भोसले (पाटील), माजी सदस्य कल्लाप्पा कुटे, वसंतदादा पाटील दूध संघाचे माजी उपाध्यक्ष विष्णूपंत चव्हाण (पाटील) तसेच खरसुडीचे माजी सरपंच अर्जुन पुजारी यांनी आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला. या सर्वांचे पाटील यांनी पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा नेते अमर सिंह देशमुख, विलास काळेबाग, मकरंद देशपांडे, संगीताताई खोत, विठ्ठल तात्या खोत यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी पंचायत समिती सदस्य कल्लाप्पा अण्णा कुटे, मार्केट कमिटीचे संचालक कैलास बापू देवडकर, युवा नेते सतीश मुढे, शिवसेना तालुका उपाध्यक्ष सत्यवान सरगर, करगणीचे माजी उपसरपंच किसन काळे, माजी सरपंच अर्जुन सावकर, सौ. लताताई पुजारी, विनायक भोसले, तसेच ग्रामपंचायत सदस्य, विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन सौ. सुवर्णा पुजारी, माजी सरपंच श्री. निवास भोसले व असंख्य कार्यकर्त्यांचा समावेश होता.
भारतीय जनता पार्टीच्या विकासाभिमुख विचारधारेवर विश्वास ठेवत, सर्व नवप्रवेशितांचे पक्षात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. सर्वांच्या सहकार्याने सांगली जिल्ह्याचा सर्वांगीण विकास अधिक गतीने साध्य करू, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.