कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी राधानगरी तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या तुरंबेच्या गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यावेळी म्हणाले, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणाऱ्या विविध गरीबकल्याणकारी योजनांचा लाभ जिल्ह्यातील असंख्य नागरिकांना मिळत आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील जनतेसाठी प्रभावी योजनांच्या माध्यमातून गरीब, कष्टकरी आणि सर्वसामान्यांना मोठा आधार दिला आहे. या सर्व विकासकामांना अधिक गती देण्यासाठी आणि मोदीजी व देवेंद्रजी यांचे हात बळकट करण्यासाठी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी पाटील यांनी केले.
या प्रसंगी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, प्रदेश सचिव महेश जाधव, राहुल चिकोडे, कोल्हापूर महापालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक विजयसिंह खाडे-पाटील, तालुकाध्यक्ष स्वप्नील जरग, संतोष कातिवले तसेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीतील सर्व उमेदवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.