ई-गव्हर्नन्समध्ये तंत्रशिक्षण विभागाची बाजी! ६८ कार्यालयांना मागे टाकत संचालनालय राज्यात अव्वल… उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून टीमचे अभिनंदन

12

मुंबई : भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत उत्तम कामगिरी बजावणाऱ्या महाराष्ट्रातल्या सर्वोत्कृष्ठ कार्यालयांची क्रमवारी जाहीर झाली आहे. १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमाचा हा भाग आहे. यात सर्वोत्कृष्ठ आयुक्त/संचालक म्हणून ६८ कार्यालयांतून तंत्रशिक्षण संचालक कार्यालयाची निवड झाली आहे. २०० पैकी १७२.७५ गुणांमुळे हा पहिला क्रमांक मिळाला. उच्च व तंत्र शिक्षण विभागाने बाजी मारली आहे. ‘भारतीय गुणवत्ता परिषदे’मार्फत (QCI) करण्यात आलेल्या मूल्यमापनात प्रशासकीय कामाचा दर्जा आणि गती यावर मोहोर उमटवण्यात आली आहे. या यशाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी समाधान व्यक्त केले.

याबाबत पाटील म्हणाले, काम चोख असावं, असा सगळ्यांचा कटाक्ष असतोच. पण, आपले प्रयत्न योग्य दिशेने सुरू आहेत याची पावती मिळणं, समाधान देऊन जातं. सर्वोत्कृष्ठ शासकीय संस्था/मंडळे आणि कंपन्यांच्या ९७ जणांच्या यादीतून तंत्रशिक्षण मंडळास १६३ गुणांसह सातवा क्रमांक मिळाला आहे. तसेच सेवाकर्मी प्लस श्रेणीतही मुंबई विद्यापीठाचा समावेश झाला आहे.

हे यश सुखावणारं आहेच, पण अनेकांच्या कष्टांतून, प्रयत्नांतून ते मिळालं आहे. त्यामुळे या यशाचं श्रेय अविरत काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांच आहे. आमच्या टीमचं आहे… इथेच न थांबता आम्ही सगळे मिळून आणखी प्रयत्न करू, यापुढे अधिकाधिक चांगली कामगिरी करू. या प्रयत्नात प्रत्येकाची साथ असेल, यात शंकाच नाही. प्रत्येक सहकाऱ्याचं अभिनंदन आणि तुमच्या कामाचं मनापासून कौतुक, अशा शब्दात पाटील यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.