भोरमध्ये राष्ट्रवादीचे माजी उपसभापती मानसिंगबाबा धुमाळ यांचा मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पुणे : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत भोर तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. भोर पंचायत समितीचे माजी उपसभापती मानसिंगबाबा धुमाळ यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत (भाजप) प्रवेश केला आहे. पुण्यात आयोजित भोर तालुक्यातील निवासी कार्यकर्त्यांच्या भव्य मेळाव्यात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.
यावेळी तालुक्यातील विविध पक्षांतील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीवर विश्वास व्यक्त करत जाहीर प्रवेश केला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून भोर पंचायत समितीचे मा.उपसभापती मानसिंगबाबा धुमाळ, सौ.वंदनाताई धुमाळ, रामदास जेधे, रोहिदास जेधे, मोहन जेधे, युवराज जेधे यांचा समावेश होता. पक्षात त्यांचे मनःपूर्वक स्वागत करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर, भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्रामभाऊ थोपटे, भाजपा पुणे ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष शेखर वढणे, भाजपा राज्य परिषद सदस्य बाळासाहेब गरुड, भोर तालुका उत्तर मंडल अध्यक्ष संतोष धावले, दक्षिण मंडल अध्यक्ष रवींद्र कंक यांच्यासह भाजपाचे तालुक्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व भोर तालुक्यातील हजारो कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.