आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची मंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतली भेट; तब्येतीची केली विचारपूस

11

सांगली  : सांगलीचे लोकप्रिय आमदार सुधीरदादा गाडगीळ हे गेल्या काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात उपचार घेत आहेत. आज राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची सविस्तर विचारपूस केली.

डॉक्टरांच्या माहितीनुसार, आमदार गाडगीळ हे वैद्यकीय उपचारांना उत्तम प्रतिसाद देत आहेत. चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धीर दिला. “दादांनी लवकरात लवकर पूर्ण बरे व्हावे आणि पुन्हा जोमाने जनसेवेत सक्रिय व्हावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना,” अशा भावना पाटील यांनी यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी पाटील यांच्यासोबत सांगलीचे भाजपचे काही पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.