सांगली जिल्हा परिषद निवडणूक: मोदी-फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवा; माहुलीत चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

6

सांगली : सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत खानापूर तालुक्यातील माहुली येथे भारतीय जनता पार्टीची भव्य चौक सभा संपन्न झाली. जिल्हा परिषद नागेवाडी गट आणि पंचायत समिती गार्डी गणातील भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित या सभेला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संबोधित केले.

सभेला संबोधित करताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्वसामान्यांच्या हिताचे अनेक ऐतिहासिक निर्णय घेतले आहेत. हा विकासाचा रथ गावगाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे हात अधिक बळकट करणे आवश्यक आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपच्या उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा.

या प्रसंगी भाजपाचे नेते वैभव पाटील, दाजीबा पवार, संग्राम माने, राजू जानकर, महेश कराडे, जिल्हा परिषद नागेवाडी गटाच्या उमेदवार सौ. सुजाता माने, नागेवाडी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. वर्षा गुरव, गार्डी पंचायत समिती गणाच्या उमेदवार सौ. संगिता जगताप यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व माहुली परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.