झेडपी निवडणुकीसाठी हातकणंगलेमध्ये भाजपचा झंझावात… ग्रामीण विकासासाठी महायुतीला विजयी करण्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

20

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात कुंभोज जिल्हा परिषद गट तसेच लाटवडे व कुंभोज पंचायत समिती गणातील भाजपा महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ लाटवडे येथे आयोजित जाहीर सभेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदार बांधवांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने कृषी पायाभूत सुविधा, ‘हर घर जल’ योजना आणि दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या विकासाला नवी गती दिली आहे.

यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, या दुहेरी इंजिन सरकारमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक निधी मिळून विकासाचा वेग आणखी वाढणार आहे. याच विश्वासाने भाजपा महायुतीला प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी उपस्थित ग्रामस्थांना केले.

या प्रसंगी इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे, शिवाजी पाटील, बाबासो चौगुले, उत्तम पाटील, अमरसिंह पाटील, कृष्णात माळी, जिल्हा परिषदेच्या कुंभोज गटाच्या उमेदवार सन्मती चौगुले, लाटवडे पंचायत समिती गणाचे उमेदवार अशोक माळी यांच्यासह भाजपा महायुतीचे पदाधिकारी आणि दोन्ही गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.