तारदाळमध्ये महायुतीचा विजयाचा निर्धार; महायुतीच्या उमेदवारांना विजयी बहुमताने विजयी करा – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे कोरोची जिल्हा परिषद गट आणि तारदाळ पंचायत समिती गणातील भाजपा महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला.
पाटील याबेली म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारने लोककल्याणासाठी घेतलेले निर्णय, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी उपलब्ध होणाऱ्या निधीबाबत माहिती देत महायुतीच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले. सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व ग्रामस्थांचे पाटील यांनी मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी इचलकरंजीचे आमदार राहुल आवाडे, शिवाजी पाटील, बाबासो चौगुले, उत्तम पाटील, अमरसिंह पाटील, कृष्णात माळी, कोरोची जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सानिका आवाडे, तारदाळ पंचायत समितीच्या उमेदवार प्रियंका खोबरे यांच्यासह भाजपा महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.