160

चिंचवड : गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या एमसीए क्रिकेट स्टेडियमला दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष व माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पिंपरी-चिंचवड शहरात रस्ते, पाणी यासह अनेक मूलभूत गरजांच्या विकासासह क्रीडा क्षेत्रामध्येही मोठे योगदान राहिले असून शहरातील तरुणांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी दूरदृष्टीने अनेक निर्णय घेतले. गहुंजे येथे उभारण्यात आलेले एमसीए स्टेडियम हे आंतरराष्ट्रीय स्तरावरील मैदान असून, त्याच्या उभारणीसाठी अजित पवार यांनी पुढाकार घेतला होता. त्यांचे योगदान लक्षात घेता एमसीए क्रिकेट स्टेडियमला त्यांचे नाव देणे ही त्यांच्या कार्याला योग्य अशी आदरांजली ठरेल,असे भोंडवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घ्यावा, अशी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी अपेक्षा असल्याचे देखील म्हटले आहे.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.