स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता वाढणार; इचलकरंजी मनपाच्या नूतन प्रशासकीय वास्तूचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न

9

कोल्हापूर : इचलकरंजी महानगरपालिकेत नव्याने उभारण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृह तसेच पदाधिकारी दालनांचे लोकार्पण ९ फेब्रुवारी रोजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

या आधुनिक सभागृहामुळे महापालिकेतील नगरसेवक-नगरसेविकांना सभा, चर्चा आणि प्रशासकीय कामकाजासाठी अधिक सक्षम व उपयुक्त सुविधा उपलब्ध होणार असून, स्थानिक प्रशासनाची कार्यक्षमता निश्चितच वाढेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

हे सभागृह अत्याधुनिक ध्वनी यंत्रणा, आसनव्यवस्था आणि डिजिटल सुविधांनी सज्ज आहे. महानगरपालिकेतील लोकप्रतिनिधींना धोरणात्मक चर्चा, सभा आणि प्रशासकीय कामकाजासाठी आता हक्काची आणि सक्षम जागा उपलब्ध झाली आहे. या नवीन सुविधांमुळे स्थानिक प्रशासनाच्या कामकाजात सुसूत्रता येईल आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेग मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या लोकार्पण सोहळ्यास खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, माजी मंत्री प्रकाशआण्णा आवाडे, माजी आमदार सुरेशराव हाळवणकर, महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, सौ. मोश्मी आवाडे, नूतन नगरसेवक-नगरसेविका, प्रमुख पदाधिकारी तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.