पुणे मनपाच्या महापौरपदी मंजुषा नागपुरे, तर उपमहापौरपदी परशुराम वाडेकर विराजमान; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत स्वीकारला पदभार

10

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या महापौरपदी सौ. मंजुषाताई नागपुरे आणि उपमहापौरपदी परशुरामजी वाडेकर यांनी गुरुवारी, ९ फेब्रुवारी रोजी आपला पदभार स्वीकारला. पुणे महानगरपालिका भवन येथे आयोजित एका विशेष सोहळ्यात या दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या सोहळ्याला प्रत्यक्ष उपस्थित राहून नूतन महापौर आणि उपमहापौरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले की, पुणे शहराच्या प्रलंबित प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी आणि शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे नवीन नेतृत्व अत्यंत मोलाची भूमिका बजावेल.

या प्रसंगी महापालिकेतील विविध पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत हा जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेशजी पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, महापालिकेतील गटनेते गणेश बीडकर, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच पक्षाचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.