कोल्हापूरच्या महापौरपदी भाजपच्या रूपाराणी निकम, तर उपमहापौरपदी जनसुराज्यचे अक्षय जरग विराजमान… मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकार

21

कोल्हापूर : कोल्हापूर करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या कृपेने आणि कोल्हापूरकरांच्या आशीर्वादाने कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी भाजपाच्या रूपाराणी संग्रामसिंह निकम आणि उपमहापौरपदी जनसुराज्य शक्ती पक्षाचे अक्षय विक्रम जरग यांची निवड होऊन आज त्यांनी अधिकृतपणे पदभार स्वीकारला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून दोघांनाही मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, कोल्हापूरच्या सर्वांगीण विकासासाठी आई आंबाबाई त्यांना सामर्थ्य देवो, ही प्रार्थना. शहराच्या प्रगतीसाठी महायुतीच्या माध्यमातून सकारात्मक आणि लोकाभिमुख कामाची नवी दिशा मिळेल, असा विश्वास असल्याचे देखील त्यांनी म्हटले.

ही निवड ६ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या विशेष सर्वसाधारण सभेत बहुमताने करण्यात आली. महापौरपदाच्या शर्यतीत रूपाराणी निकम यांना ४६ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे सचिन मारुती शेंडे यांना ३५ मते मिळाली. कोल्हापूर महानगरपालिकेच्या ५० वर्षांच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा महापौर विराजमान झाला असून महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकला आहे.

यावेळी खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य पक्षाचे नेते आणि माझे मित्र विनय कोरेजी, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, भाजपा नेते जयंत पाटील, महेश जाधव, शिवसेनेचे नेते सत्यजीत कदम, ऋतुराज क्षीरसागर, शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव यांच्यासह महायुतीचे सर्वच प्रमुख नेते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.