कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात नवनवीन तंत्रज्ञान आणणारे व त्याची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारे भिमा कृषी प्रदर्शन एकमेव प्रदर्शन – मंत्री चंद्रकांत पाटील

19

कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे भव्य आणि दिव्य सलग चार दिवस रेकॉर्ड ब्रेक गर्दीचा उच्चांक ठरलेल्या भिमा कृषी व पशु प्रदर्शनाचा सांगता समारंभ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

कोल्हापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात नवनवीन तंत्रज्ञान आणणारे व त्याची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणारे हे भिमा कृषी प्रदर्शन एकमेव प्रदर्शन आहे. शासनाच्या योजनांना गती देण्याचं काम लोकप्रतींच्या माध्यमातून अशा विविध उपक्रमा मार्फत होत आहे. याचा आम्हाला आनंद आहे. असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. पाच फुटांचा इग्वाना, बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध हरण्या बैल, १२ लाखांचा खिल्लार खोंड, १४०० किलोचा मुरा रेडा, ३० लिटर दूध देणारी एच एफ गाय तसेच अमेरिकन शेळ्या-बोकड यंदाच्या प्रदर्शनातील प्रमुख आकर्षण होते. या भव्य सोहळ्यास उपस्थित राहून उत्कृष्ट आयोजनाबद्दल पाटील यांनी आयोजकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

शेतकरी राजा हा आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला पाहिजे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून गेली 18 वर्षे भिमा कृषी व प्रदर्शनात सातत्यता ठेवली आहे. याबद्दल पालकमंत्री आबिटकर यांनी कौतुक केले. तसेच पुढील कार्यास सदिच्छा दिल्या.

18 वर्षांपूर्वी छोट्या स्वरूपात सुरुवात केलेला हा भीमा कृषी प्रदर्शनाचा उपक्रम वर्षानुवर्ष अधिक वाढत जात आहे शेतकरी बांधवांसह सर्वांनीच या प्रदर्शनाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. पारंपरिक शेतीमधून प्रगतशील शेतीकडे वेळेला शेतकरी वर्ग या प्रदर्शनाच्या माध्यमातून आपल्या शेतीतील उत्पादन वाढवत आहे हेच खरे या प्रदर्शनाचे फलित आहे.

यावेळी आमदार अशोकराव माने, शाहू समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, इचलकरंजी महानगरपालिकेचे महापौर  उदय धातुंडे, उपमहापौर  अनिल डाळ्या,  प्रा. जयंत पाटील सर  महेश जाधव,  विजय जाधव,  राहुल चिकोडे,  पृथ्वीराज महाडिक,  कृष्णराज महाडिक यांच्यासह नूतन नगरसेवक व भाजपा पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.