लोकसेवेचे कार्य अधिक जोमाने करा, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे नवनिर्वाचित सदस्यांना आवाहन
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने मिळवलेल्या देदीप्यमान यशाची दखल घेत, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज नवनिर्वाचित सदस्यांचा विशेष सत्कार केला, तसेच कार्यक्रमात सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि लोकराजे राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनकार्यापासून प्रेरणा घेत महायुती सरकार सर्वसामान्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. माननीय नरेंद्र मोदीजी आणि देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जनकल्याणाची हीच शिकवण पुढे नेत, लोकसेवेचे कार्य अधिक जोमाने करण्याचे आवाहन सर्व नवनिर्वाचित सदस्यांना यावेळी करण्यात आले.
या कार्यक्रमास माजी आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष तेजस्विनी कतले, मार्केट कमिटी चेअरमन गरड सर, मोहन डांगरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, बाजार समिती सदस्य, नगरसेवक-नगरसेविका तसेच भाजपा महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.