मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सपत्नीक तुळजापूर दर्शन; ‘जनता सुखी आणि निरोगी राहो’ अशी आई भवानीच्या चरणी प्रार्थना!

11

तुळजापूर  : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी प्रमुख पीठ असलेल्या व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आई श्री तुळजाभवानीच्या चरणी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत  पाटील यांनी आज सपत्नीक नतमस्तक होऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांनी देवीची मनोभावे पूजा-अर्चा करून आशीर्वाद प्राप्त केले.

१२ व्या शतकातील हेमाडपंथी वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या प्राचीन मंदिराची पाहणी करत चंद्रकांत पाटील यांनी भवानी मातेचा इतिहास आणि छत्रपती शिवाजी महाराजांना मिळालेल्या ‘भवानी तलवारी’च्या स्मृतींना उजाळा दिला. “ॐ सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः” या संस्कारमंत्राचा उच्चार करत, त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक सुखी, निरोगी आणि समृद्ध व्हावा, अशी प्रार्थना केली.

हातात घेतलेला जनसेवेचा वसा अखंडपणे सुरू राहण्यासाठी आणि राज्यातील शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी आई तुळजाभवानीचा कृपाशीर्वाद सदैव पाठीशी राहो, असा संकल्पही पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. दर्शनानंतर त्यांनी मंदिराच्या परिसरातील भाविकांशी संवाद साधून सोयीसुविधांची देखील माहिती घेतली.

 

Get real time updates directly on you device, subscribe now.