फलटणच्या ‘दिव्यस्पर्शी होलिस्टिक हिलिंग सेंटर’ला मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट; निसर्गोपचार पद्धतीचा ग्रामीण भागात प्रसार होणे काळाची गरज!

13

सातारा : सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उभारण्यात आलेल्या दिव्यस्पर्शी होलिस्टिक हिलिंग ॲण्ड रिसर्च सेंटरच्या वतीने आयोजित सस्नेह मेळाव्यास आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना पाटील म्हणाले, नेचरोपॅथी ही औषधमुक्त उपचार पद्धती शरीराच्या स्वतःला बरे करण्याच्या नैसर्गिक शक्तीवर आधारित आहे. आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत चाललेल्या आजारांच्या पार्श्वभूमीवर अशा नैसर्गिक उपचार पद्धतींचा ग्रामीण भागात प्रचार व प्रसार होणे अत्यंत आवश्यक आहे. लोकसहभागातून उभारलेले हे सेंटर ग्रामीण नागरिकांना निरोगी, संतुलित आणि सशक्त जीवन जगण्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.

यावेळी पाटील यांच्या पत्नी अंजली, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. अतुलबाबा भोसले, आ. सचिन पाटील, फलटणचे नगराध्यक्ष समशेरसिंह निंबाळकर, निसर्गोपचार तज्ज्ञ रुपाली पवार, अमित कुलकर्णी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.