सेवेचा नवा संकल्प-उमेद फाउंडेशनच्या ‘बालक-पालक’ प्रकल्पाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकार्पण

6

पुणे : पुणे येथे उमेद फाउंडेशन संचालित महाराष्ट्रातील पहिल्या दिव्यांग मुले आणि पालकांसाठीच्या ‘बालक-पालक’ प्रकल्पाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण रा. स्व. संघाचे प्रांत संघचालक नानासाहेब जाधव आणि अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांच्या हस्ते संपन्न झाले. या अत्यंत हृदयस्पर्शी उपक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी संबोधित करताना पाटील म्हणाले, हिंदू संस्कृती म्हणजे प्रेम आणि दुसऱ्यासाठी झटण्याचा संस्कार. “संघ काही करणार नाही, पण सगळं काही होणार आहे” या विचारातूनच संघाचे लाखो कार्यकर्ते अहोरात्र काम करत असतात. राकेश सणस यांच्यासारख्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमातूनच ‘उमेद’ सारखी समाजासाठी विधायक कामे उभी राहत आहेत. हा उपक्रम महाराष्ट्रात सामाजिक काम करणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठी प्रेरणा आहे.

दिव्यांग मुलांना सांभाळताना पालकांना ज्या अडचणी येतात, त्या केवळ त्यांनाच ठाऊक असतात. “आमच्या पश्चात या मुलांचा सांभाळ कोण करेल?” हा पालकांसमोरचा आणि समाजासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम अत्यंत प्रभावीपणे केले जात आहे. संघाच्या संस्कारांमुळेच मी माझी जबाबदारी मानून या कार्यात योगदान देऊ शकलो. अशा विधायक कामांमध्ये सर्वांनी योगदान देणे ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, जेणेकरून समाजकार्याचा हा यज्ञ असाच सतत कार्यरत राहील, असे पाटील यांनी यावेळी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.