छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा प्रारंभ

9

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन २०२६ ला आजपासून मुंबईतील विधानभवन येथे दिमाखात सुरुवात झाली. अधिवेशनाच्या कामकाजाला प्रारंभ करण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधानभवन परिसरातील हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

यावेळी संसदीय कार्यमंत्री तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच मंत्रिमंडळातील सहकारी व आमदार उपस्थित होते.

स्वराज्य, सुशासन आणि लोककल्याणाचा आदर्श समोर ठेवत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजास प्रारंभ करण्यात आला. जनतेच्या अपेक्षा, राज्याच्या सर्वांगीण विकासाची दिशा आणि आगामी धोरणात्मक निर्णय यांसाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे पाटील यांनी म्हटले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ६ मार्च २०२६ रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे अधिवेशन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासाठी विशेष आहे, कारण पदभार स्वीकारल्यानंतरचे हे त्यांचे पहिलेच अधिवेशन आहे. या अधिवेशनात सुमारे १५ नवीन विधेयके मांडली जाण्याची शक्यता असून, दिवंगत नेते अजित पवार यांनी तयार केलेल्या आराखड्यानुसार विकासाच्या विविध योजनांना गती दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.