महाराष्ट्राच्या कला संस्कृतीला अधिक समृद्ध करण्यासाठी आमचे शासन सदैव कटिबद्ध – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

1

मुंबई : मुंबई येथील ऐतिहासिक सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन संस्थेला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांच्या २०२५-२६ च्या वार्षिक कला प्रदर्शनाची पाहणी केली. ७५ वर्षांहून अधिक परंपरा असलेल्या या प्रदर्शनात ५०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कलाकृती पाहून भारावून गेलो. पोर्ट्रेट, प्रिंटमेकिंग, सर्जनशील चित्रकला आणि भित्तिचित्र या पदव्युत्तर अभ्यासक्रमांतील कलाकृतींनी विशेष लक्ष वेधले, असल्याची प्रतिक्रिया पाटील यांनी व्यक्त केली.

पाटील यांनी म्हटले, यावर्षी नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘समकालीन कला पद्धती’ या अभ्यासक्रमांतील विद्यार्थ्यांच्या सादरीकरणातून आधुनिक विचारसरणी आणि नव्या अभिव्यक्तीचे दर्शन घडले. महाराष्ट्राच्या कला संस्कृतीला अधिक समृद्ध करण्यासाठी आमचे शासन सदैव कटिबद्ध आहे. या युवा कलावंतांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी कुलगुरू डॉ. हिम चॅटर्जी, महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, संबंधित अधिकारी, प्राध्यापक व इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.