युवा पिढीची कल्पकता आणि त्यांचा नवोन्मेषी दृष्टिकोन भविष्यातील प्रगतीची ग्वाही देतो – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज जयंती आणि मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने मुंबईत आयोजित ‘मायमराठी कलासंगम – उत्सव मराठीचा’ या विशेष कार्यक्रमाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी हजेरी लावली. या भेटीदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील ऐतिहासिक शस्त्रास्त्रांची प्रत्यक्ष पाहणी पाटील यांनी केली. ही शस्त्रे पाहून आपला गौरवशाली इतिहास डोळ्यांसमोर जिवंत झाल्याचा प्रकर्षाने अनुभव आला. आपल्या पूर्वजांचे शौर्य आणि युद्धकौशल्य यांची प्रचिती या माध्यमातून आली, असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

पाटील पुढे म्हणाले, प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृती, नाविन्यपूर्ण डिझाइन संकल्पना आणि वास्तुशास्त्रीय (Architectural) प्रकल्पांचे सादरीकरण खरोखरच कौतुकास्पद होते. युवा पिढीची कल्पकता आणि त्यांचा नवोन्मेषी दृष्टिकोन भविष्यातील प्रगतीची ग्वाही देतो. आपल्या मराठी भाषेचा आणि संस्कृतीचा वारसा अशा उपक्रमांतून पुढच्या पिढीपर्यंत पोहचताना पाहून मनस्वी आनंद झाला, असल्याचे पाटील म्हणाले.
याप्रसंगी माझ्यासोबत ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संपादक पराग करंदीकर, समीर कर्वे आणि पत्रकार मित्र उपस्थित होते.