महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘कॉन्फरन्स हॉल’चे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन संपन्न
मुंबई : मुंबई येथे महाराष्ट्र राज्य कला संचालनालयाच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या ‘कॉन्फरन्स हॉल’चे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उत्साहात उद्घाटन करण्यात आले. कलेच्या प्रांतात नवीन संकल्पनांना आणि धोरणात्मक निर्णयांना गती देण्यासाठी हा हॉल एक महत्त्वाचे केंद्र ठरेल, असा विश्वास यावेळी पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना पाटील म्हणाले, कला शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि विद्यार्थ्यांसाठी आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देणे ही आमची प्राथमिकता आहे. या नूतनीकरणामुळे प्रशासकीय कामात अधिक सुसूत्रता येईल आणि कला संचालनालयाच्या कार्याला नवी ऊर्जा मिळेल, असेही त्यांनी म्हटले.
या प्रसंगी कला संचालनालयाचे संचालक डॉ. किशोर इंगळे, सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, आर्किटेक्चर अँड डिझाइन विद्यापीठाचे कुलसचिव शशिकांत काकडे, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळाचे संचालक विनोद दांडगे, मंडळाच्या सचिव स्मिता किंकळे आणि इतर संबंधित अधिकारी व प्राध्यापक उपस्थित होते.