जागतिक टेनिसच्या मैदानात महाराष्ट्राचा झेंडा-पुण्याच्या लेकीची ऐतिहासिक भरारी! – मंत्री चंद्रकांत पाटील

6

पुणे : जागतिक टेनिसच्या पटलावर महाराष्ट्राचा झेंडा पुन्हा एकदा अभिमानाने फडकला आहे! बंगळुरू येथे पार पडलेल्या ITF W100 ओपन टेनिस स्पर्धेत पुण्याच्या २१ वर्षीय वैष्णवी अडकर हिने उपविजेतेपद पटकावून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. वैष्णवीच्या या यशाबद्दल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

चंद्रकांत पाटील यांनी म्हटले, एक पुणेकर लोकप्रतिनिधी या नात्याने मला तिचा विशेष अभिमान वाटतो, कारण दिग्गज टेनिसपटू सानिया मिर्झानंतर या प्रतिष्ठित स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी वैष्णवी ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. ही केवळ एका खेळाडूची प्रगती नाही, तर पुण्याच्या क्रीडा संस्कृतीचा हा मोठा विजय आहे. वैष्णवी, तुझे हे यश आगामी पिढीतील अनेक खेळाडूंना प्रेरणा देणारे आहे. तुझे जिद्द आणि कठोर परिश्रम नक्कीच तुला भविष्यात जागतिक क्रमवारीत सर्वोच्च स्थानी नेतील, हा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

पुण्याची २१ वर्षीय टेनिसपटू वैष्णवी अडकर हिने बेंगळुरू येथे झालेल्या आयटीएफ (ITF) W100 महिला टेनिस स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करत उपविजेतेपद पटकावले आहे. २००९ नंतर सानिया मिर्झाव्यतिरिक्त या स्तरावरील (W100 किंवा उच्च) एकेरीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला ठरली आहे. ६९० वे जागतिक मानांकन असलेल्या वैष्णवीने वाइल्डकार्डद्वारे प्रवेश करून अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. सानिया मिर्झानंतर १७ वर्षांनी, W100 किंवा त्याहून उच्च स्तरावरील आयटीएफ स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी वैष्णवी पहिली भारतीय महिला टेनिसपटू आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.