भाजपच्या राज्यसभा उमेदवारांनी भरला अर्ज… महाराष्ट्राच्या विकासासाठी या सर्व अनुभवी नेतृत्वाचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटील

8

मुंबई : भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने जाहीर केलेले महाराष्ट्रातील राज्यसभेचे चारही उमेदवार विनोद तावडे, रामदास आठवले, श्रीमती मायाताई ईवनाते आणि रामराव वडकुते यांनी आज आपले उमेदवारी अर्ज विधानभवनात दाखल केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा अर्ज भरण्याचा सोहळा पार पडला.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उपस्थित राहून सर्व उमेदवारांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राच्या विकासासाठी या सर्व अनुभवी नेतृत्वाचे योगदान निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भाजपने या निवडणुकीत सामाजिक समीकरणे आणि संघटनात्मक अनुभव लक्षात घेऊन विनोद तावडे, रामदास आठवले यांच्यासह आदिवासी चेहरा असलेल्या मायाताई ईवनाते आणि धनगर समाजाचे प्रतिनिधित्व करणारे रामराव वडकुते यांना संधी दिली आहे. उमेदवारी अर्ज भरताना मंत्रिमंडळातील इतर मंत्री , आमदार आणि पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, ज्यामुळे महायुतीचे शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले.

Get real time updates directly on you device, subscribe now.