मुंबईत भाजपाची विभागीय बैठक; पश्चिम महाराष्ट्रातील प्रलंबित प्रश्नांवर खलबते
मुंबई : मुंबईतील भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम महाराष्ट्र विभागातील भाजपाचे मंत्री व आमदारांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून विविध विषयांवर चर्चा केली.
यावेळी विधानभवनातील महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच विभागनिहाय संघटनात्मक कामकाज, मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न आणि सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबतही चर्चा केली. या बैठकीमुळे आगामी काळात पश्चिम महाराष्ट्रातील विकासकामांना वेग येण्याची आणि संघटनात्मक बांधणी अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे.
या प्रसंगी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार किरीट सोमय्या, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, आ. योगेश सागर, आ. संजय कुटे, माधवीताई नाईक, राजेश पांडे, सुनील राणे, मुख्यालय प्रभारी रवि अनासपुरे आणि पश्चिम महाराष्ट्रातील सर्व आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.