मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी भाजप सज्ज; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘एसआयआर’ बैठक संपन्न

7

मुंबई : महाराष्ट्रातील मतदार यादी अद्ययावत करण्याच्या उद्देशाने राबवण्यात येणाऱ्या ‘एसआयआर’ प्रक्रियेसंदर्भात भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बैठक पार पडली. या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती.

या बैठकीला भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, एसआयआर अभियानाचे राष्ट्रीय संयोजक व राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग , एसआयआर अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी भगवानदास सबनानी , एसआयआरचे प्रदेश संयोजक माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपा मुंबई अध्यक्ष आ. अमित साटम, प्रदेश सरचिटणीस आ. योगेश सागर, प्रदेश सरचिटणीस आ. संजय कुटे, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस माधवीताई नाईक, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे यांच्यासह भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाध्यक्ष, महापौर आणि पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘एसआयआर’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच, नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात आला.

‘एसआयआर’ म्हणजे विशेष सघन पुनरीक्षण (Special Intensive Revision). ही निवडणूक आयोगाद्वारे राबवली जाणारी एक प्रक्रिया आहे, ज्यामध्ये घर-घर सर्वेक्षण करून मतदार यादीतील मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळली जातात आणि पात्र नागरिकांची नावे समाविष्ट केली जातात.

Get real time updates directly on you device, subscribe now.