मनसुखानी महाविद्यालयातील तक्रारींच्या चौकशी अहवालावर आवश्यक कार्यवाही करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

8

मुंबई : उल्हासनगर येथील श्रीमती चांदीबाई हिम्मतला मनसुखानी महाविद्यालयातील कामकाज व इतर काही प्रश्नासंदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी गठित समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालाच्या आधारे पुढील आवश्यक कार्यवाही केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासावेळी सांगितले.

सदस्य डॉ. मनिषा कायंदे यांनी या विषयी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता.

पाटील म्हणाले, या महाविद्यालयाच्या निकाल व पुनर्पडताळणी संदर्भातील तक्रारींची चौकशी करण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या डॉ. शिवाजी सरगर यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली होती.

या महाविद्यालयातील नियुक्ती संदर्भात प्राप्त तक्रारीसंदर्भात पाटील म्हणाले, संबंधित प्रकरणातील नियुक्ती ही २ जानेवारी १९९८ पूर्वी झालेली आहे. त्या काळात अर्जासोबत सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांच्या आधारेच पडताळणी करून भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असेही पाटील यांनी सांगितले.

Get real time updates directly on you device, subscribe now.