मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्निक उभारली गुढी; आई अंबाबाई चरणी सुख-समृद्धीसाठी साकडे

13

कोल्हापूर : हिंदू नववर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या मंगल मुहूर्तावर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोल्हापूर येथील निवासस्थानी सपत्निक पारंपरिक पद्धतीने गुढी उभारली. चैत्र शुद्ध प्रतिपदेचे स्वागत करताना त्यांनी महाराष्ट्राच्या उज्ज्वल परंपरेचा वारसा जपण्याचा संदेश दिला.

नूतन वर्षाची सुरुवात करताना चंद्रकांत पाटील यांनी करवीरनिवासिनी आई अंबाबाईचे सपत्निक दर्शन घेतले. देवीच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी संपूर्ण राज्याच्या सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना केली.

“हे नवीन वर्ष सर्वांच्या आयुष्यात आनंदाची उधळण करो आणि सर्वांचे आयुष्य सुख-समृद्धीने भरून जावो,” अशा शब्दांत त्यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.

Get real time updates directly on you device, subscribe now.