सकल हिंदू समाज व हिंदू नववर्ष स्वागत समितीच्या भव्य संमेलनात मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सहभाग; एकात्मता आणि संस्कृती जतनाचे आवाहन

9

पुणे : भारतीय संस्कृतीचे जतन आणि समाजातील एकात्मता अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने पुण्यात ‘सकल हिंदू समाज’ व ‘हिंदू नववर्ष स्वागत समिती’च्या वतीने भव्य हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनात राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून समाजातील विविध घटकांशी संवाद साधला.

याप्रसंगी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी भारतीय संस्कृतीतील उदात्त विचारांचा उल्लेख केला. ते म्हणाले, “आपली संस्कृती ‘सर्वे सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः’ या भावनेवर आधारित आहे. ही प्रार्थना केवळ एका वर्गासाठी नसून सर्वांच्या कल्याणाची सार्वत्रिक भावना व्यक्त करते. अशा संमेलनांच्या माध्यमातून समाजात सकारात्मक विचार आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचे कार्य होत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.”

या उपक्रमातून समाजात सद्भावना, ऐक्य आणि राष्ट्रभावना अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. हिंदू नववर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित या संमेलनात हजारो नागरिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी आणि जयघोषाने भारावून गेला होता.

Get real time updates directly on you device, subscribe now.