सांगलीत ‘जनप्रवास’ तर्फे कर्तृत्ववान महिलांचा ‘रणरागिणी गौरव’; मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान

40

सांगली : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक ‘जनप्रवास’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘रणरागिणी गौरव २०२६’ सोहळ्यात समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला. महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या गुणवंत महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान हा प्रेरणादायी असून महिला सक्षमीकरणासाठी अशा उपक्रमांचे मोठे महत्त्व आहे, असे मत पाटील यांनी यावेळी व्यक्त केले. चंद्रकांत पाटील यांनी यावेळी महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर भर दिला. सांगली जिल्ह्यात जिल्हा वार्षिक योजनेतून ९०० महिलांना उद्योजकता प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. येत्या जूनपासून शाळा आणि महाविद्यालयांमध्ये मुलींना स्वसंरक्षणाचे (लाठीकाठी) प्रशिक्षण देण्याची महत्त्वपूर्ण माहिती देखील त्यांनी दिली.

या सोहळ्याला जिल्हाधिकारी अशोक काकडे, दैनिक जनप्रवासचे संपादक संजय भोकरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.