मिरा-भाईंदरमध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप जिल्हा कार्यालयास भेट; पक्षीय कामाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी साधला संवाद

5

मुंबई : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या मिरा-भाईंदर दौऱ्यादरम्यान भारतीय जनता पार्टीच्या शहर जिल्हा कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि पक्षविस्ताराच्या दृष्टीने जिल्हा पातळीवरील कामाचा सविस्तर आढावा घेतला.

उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधताना मंत्री पाटील म्हणाले की, आपल्या सर्वांच्या निष्ठेमुळे आणि अथक परिश्रमांमुळे भारतीय जनता पार्टीची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचत आहे, याचा आनंद वाटला. कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेत, त्यांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेण्याचे आश्वासनहीपाटील यांनी दिले.

या प्रसंगी आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता, भाजपा जिल्हा अध्यक्ष दिलीप जैन, भाजपा जिल्हा महिला अध्यक्षा वैशाली भोईर, जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष रणवीर बाजपेयी, जिल्हा महामंत्री ज्ञानेंन्द्र सिंह व रथीन दत्ता आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.