सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून अभिनंदन; कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नूतन सभापतींनीही घेतली भेट
कोल्हापूर : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीचे नूतन जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. डॉ. घोष यांची नुकतीच सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली असून, मंत्री पाटील यांनी त्यांना पुढील यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

दुसरीकडे, कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अर्थ व शिक्षण सभापती म्हणून जनसुराज्य शक्ती पक्षाच्या सौ. शीतल यादव यांची निवड झाली आहे. निवड झाल्यानंतर सौ. यादव यांनी कोल्हापूर येथे मंत्री चंद्रकांत पाटील यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी मंत्री महोदयांनी सौ. शीतल यादव यांचे अभिनंदन करून त्यांना शिक्षण व अर्थ विभागाच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम हे देखील उपस्थित होते. यावेळी जिल्ह्याच्या विकासकामांबाबत आणि आगामी योजनांबाबत सकारात्मक चर्चा झाली.